शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

ईश्वरी कणच!



ईश्वरी कणच!

सध्या ईश्वर, परमेश्वर, गॉड यावर बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. ही तद्दन अंधश्रद्धा आहे, असे काही नाही व नसते... असे बरेच काही बोलले जाते. त्यामुळे मी परमेश्वर मानतो, असे जरी कुणी म्हटले की कोणत्या युगातला हा माणूस (की जनावर?) असा कुत्सित भाव समोरच्याच्या
चेहऱ्यावर दिसू लागतात. पण मला तसे कुणी तसे म्हटले तरी चालेल. मी अंधश्रद्ध नाही. पण परमेश्वर या संकल्पनेवर, त्या शक्तीवर माझा विश्वास आहे. यानिमित्ताने  लोकशाही वार्ता वृत्तपत्रात कार्यरत असताना दि. 08 जुलै 2012 च्या संवाद या रविवार पुरवणीत मी लिहिलेला लेख काहीसा संपादित करून येथे टाकावासा वाटला. हिग्स बोन्सन नावाचा सुक्ष्मातीसुक्ष्म कण संशोधकांनी शोधून काढल्याच्या घटनेच्या संदर्भाने तो लेख लिहिला होता. त्या कणाला गॉड्स पार्टिकल असेही म्हटले गेले. त्याअनुषंगाने 'परमेश्वर' या संकल्पनेवर या लेखात चर्चा केली आहे.

==========================================================

बुधवार, दि. ४ जुलै, २०१२ हा दिवस मानवी इतिहासातला एक क्रांतिकारी दिवस म्हणावा लागेल. विश्वनिर्मितीला कारक असणारी बाब कोणती, याचे कुतुहल मानवी मनाला शतकानुशतकांपासून आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न तो अगोदरही करीत होता. आजही करतो आहे आणि उद्याही करीतच राहणार आहे. हिग्स बोन्सन नावाचा सुक्ष्मातीसुक्ष्म कण संशोधकांनी शोधून काढला व तत्त्वाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. या कणामुळेच प्रत्येक वस्तुला वस्तुमान मिळाले असावे, अशी कल्पना आहे. विष्यात त्यावर आणखी संशोधन अपेक्षित आहे. ते होईल... आणखी नवे सिद्धान्त प्रस्थापित होतील. पण हिग्स बोन्सनमुळे त्या संशधनाला वेग मिळणार आहे आणि विश्वनिर्मितीचे नेमके गुढ उलगडण्यास मदत मिळणार आहे, हे मान्य करावेच लागेल. या कणाला काही प्रसिद्धमाध्यमांनी गॉड्स पार्टिकल असे नाव दिले आणि त्यावरून एक नवीन वादळ उठले आहे. हा कण शोधल्यामुळे आता देव, परमेश्वर अशा संकल्पांना मूठमाती देण्याची वेळ आली आहे, देवानेच ही सारी सृष्टी निर्माण केली, ही कल्पना आता ्रामक ठरली आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मुळात या साऱ्या चर्चेच्या मुळाशी देव व विश्वनिर्मिती या संकल्पनाबाबत धर्मशास्त्रात असलेल्या धारणांचे अज्ञान हेच आहे. आणि म्हणूनच मग हिग्स बोन्सनला  गॉड पार्टिकल - ईश्वरी कण म्हणायचे की गॉड्स पार्टिकल - ईश्वराचा कण म्हणायचे, की या संशोधनाने देवच नाकारला असल्याने त्याला स्पष्ट हिग्ज बोन्सनच म्हणायचे असा नवा वाद सुरू झाला. खरं तर शब्दच्छल आहे.

खरं तर विज्ञान ही आधुनिक विकसित युगाचीच देण आहे, अशी कल्पना विज्ञानवाद्यांकडून मांडण्यात येते. आणि तेच देवधर्म सब झुठ, देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा असा प्रचारही करतात. पण मानवी जीवनाचा इतिहास पाहिला तर विज्ञान ही आधुनिक विकसित युगाचीच देण आहे, असे मानणे हाही विज्ञानातला कट्टरवाद आहे. मानवी मेंदू विकसित झाल्यापासून विज्ञान उदयाला आले आहे. विज्ञान हे काही आज जन्माला आले नाही. खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, भियांत्रिकी, ही आजच्या विज्ञानाची विकसित रूपे आजसारखी नसेल, पण त्याकाळीही अस्तित्वात होती. फक्त कमतरता होती, त्यावेळी झालेले संशोधन सिद्ध करण्यासाठीच्या सामुग्रीची. पण आधुनिक विकसित युगाचीच देण असल्याचे सिद्ध करण्यासाठीच कट्टर विज्ञानवादातून नवनवे शब्दच्छल तयार केल्या जात आहेत. 

मुळात देव ही संकल्पना काय, हे समजून घेण्याची गरज आहे. देव या संकल्पनेबाबत वेगवेगळे मतप्रवाद वेगवेगळ्या धर्मांमध्ये आढळते. मुळात ही संकल्पना मानवातील विचार करण्याची व संशोधनाची प्रवृत्ती जागृत झाली, त्यानंतर उदयाला आली आहे. म्हणजे विश्वनिर्मितीनंतर...! जेव्हा मानवी मनाला कळायला लागलं, की सारी सृष्टी (त्यात चल, अचल- सजीव, निर्जीव सारं आलं) काही शक्तींच्या, तत्त्वांच्या आधाराने, सहाय्याने चालते, त्या शक्ती, ती तत्वे या सृष्टीला परिचालित करतात, त्यांना देवाचे नामाभिधान देण्यात आले. उदाहरणार्थ सजीवांना जगण्यासाठी हवेची, पाण्याची गरज असते. त्याकाळी विज्ञान प्रगत नव्हते. पण पाणी, हवा या जीवन जगण्यासाठीच्या महत्त्वाच्या बाबी आहेत, हे समजण्याइतपत मानवी मेंदू विकसित होता. आणि मग त्या तत्त्वांना, त्या शक्तींना देवतेचा दर्जा देण्यात आला. वेगवेगळ्या धर्मात फरक एव्हढाच आहे की मुस्लीम, ख्रिश्चन या सारख्या एकेश्वरवादी धर्माच्या श्रद्धेनुसार या साऱ्या शक्ती एका तत्त्वात एकवटल्या आहेत, आणि ते केंद्रीूत तत्त्व म्हणजेच ईश्वर, असे हे धर्म मानतो. त्यांना मग त्यांनी अल्ला, आकाशातला पिता असे नाव दिलेत. हिंदू धर्माने या साऱ्या शक्तींना वेगवेगळ्या देवता बनवल्या आणि मग जलदेवता, वायूदेवता, पर्जन्यदेवता, सूर्यदेवता, चंद्रदेवता, अग्निदेवता अशा देवता उदयाला आल्यात. मात्र हिंदू धर्माने केंद्रीूत शक्तीलाही नाकारले नाही. सृष्टीत प्रत्येक गोष्ट निर्मिती, रक्षण आणि लय या तीन स्थितीतून जाते. या स्थितीकार्याला संचालित करणारीही शक्ती असावी, यातून मुख्य त्रिदेवांची संकल्पना उदयास आली, ज्याला मग ब्रह्मदेव, महादेव आणि विष्णू असे म्हणण्यात आले. या साऱ्या देवता मानवी जीवनाच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समाविष्ट झाल्यात. म्हणजे ढोबळमानाने या साऱ्या देवांना देण्यात आलेले देवपण व त्यांची नावे ही विकसित मानवी मेंदूची देण आहे. मुळात जीवसृष्टीला संचालित करणाऱ्या त्या शक्ती आहेत आणि त्या अगोदरपासून अस्तिवात होत्या, हे प्रारंीच लक्षात घ्यावयास हवे. या शक्तींकडे पाहण्याचा मानवी दृष्टीकोनही सकारात्मक होता. त्यामुळे मानवाला सुसंस्कृत, विकसित, ज्ञानवंत व शीलवंत करणे हेच या शक्तीचे मुख्य कार्य आहे, हा तो सकारात्मक दृष्टिकोन होता. मग हे कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्येही मानवाने देवत्व पाहिले. त्यांना देवतेचा मान देऊन पूजेचा, आदराचा मान दिला. आजच्या काळातील प्रेषित, संत, साधू यांना त्यातून देवत्व बहाल करण्यात आले आहे.

जर मग देव ही संकल्पनाच नंतर निर्माण झाली असेल तर सृष्टी निर्माण कोणी केली? मुळात जर देव ही संकल्पनाच विकसित मानवी मेंदूने निर्माण केली, तर त्या मेंदूने विश्वनिर्मितीबाबतही चर्चा केली असेलच... होऽऽ... ती चर्चा केली. जगातल्या कोणत्याही धर्माचे मुलूत तत्त्वज्ञान पाहिले तर त्यात विश्वनिर्मितीबाबत चर्चा आहे. काही कल्पना आहे. काही संशोधन आहे. या कोणत्या संशाधनात देव कोणी जादुगार होता व त्याने हवेत हात फिरवून पृथ्वी आणली, सूर्य आणला, असे म्हटले नाही. मुस्लिम धर्म म्हणतो अल्लाने अतिशय मेहनतीने ही सृष्टी निर्माण केली, ख्रिश्चन म्हणतात आकाशातील पित्याने आपल्या कल्पनेला या सृष्टीच्या निमित्ताने प्रत्यक्षात आणले. म्हणजे तो कर्ता आहे. पण ज्याच्या सहाय्याने ते केले, ते काय? हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे हिग्स बोन्सन आहे.

यानिमित्ताने हिंदू धर्मग्रंथात या सृष्टीच्या निर्मितीबाबत काही संकेत आहेत का? हो. आहेत आणि विशेष म्हणजे ते आजच्या संशोधनाकडेच अंगुलीनिर्देश करणारे आहेत. ॠग्वेदाच्या दहाव्या खंडातील १२९ क्रमांची ऋचा काय म्हणते...? या ऋचेचा अर्थ आहे - ‘‘कोणाला माहीत आहे आणि कोण शपथेवर सांगू शकते की सृष्टीनिर्मिती कशी झाली? केव्हा झाली आणि कशी झाली? खरं तर देवही निर्मितीनंतर आलेत. मग खरं कोणाला माहीत आणि सत्य कोण सांगू शकते की केव्हा आणि कशी ही निर्मिती सुरू झाली? त्याने (निर्माता) ही निर्मिती केली की त्याने काहीच केले नाही. जर तो खरोखर असेल तर त्यालाच ते माहीत असू शकते आणि माहीत नसूही शकते.’’ म्हणजे हिंदू तत्त्वज्ञानानेही देवानेच सारे निर्माण केले असे म्हटले नाही. मग या ऋचेतला तो निर्माता कोण?

पौरुषेय प्रवर विधी या वेदांतसाराच्या ग्रंथात एक श्लोक आहे -
ूमिर्न जलं न तेजे न वायव:।
न चाकाशो न चित्तंच न बुद्धया घ्राण कोचरा:॥
न च ब्रह्मा न विष्णुश्च न च तारका:।
सर्व शून्य निरावलम्बे स्वयंू विश्वकर्मण:
म्हणजे जेव्हा जमीन, पाणी, प्रकाश, वायू काहीच नव्हते, आकाशही नव्हते. ब्रह्मा, विष्णू काहीच नव्हते. त्यावेळी सर्वत्र शून्य असताना एकच विराट विश्वकर्मा हाच अस्तित्वात होता. विराट विश्वकर्मा या तत्त्वाला मग प्रजपिता, परमपिता, वेधा, परब्रह्म, परमपुरुष, विराटपुरुष अशी नावे वेगवेगळ्या ऋषींनी दिलीत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्रिदेवातील ब्रह्मदेवाचे काम निर्मितीच असल्याने अनेकदा ब्रह्मदेव म्हणजे हा परमपिता विश्वकर्मा असल्याचा समज होता. पण वरची ऋचा तो समज खोडून काढते. यजुर्वेदातल्या १७व्या अध्यायातला श्लोक क्र. ३०हाच ऋग्वेदातल्या दहाव्या खंडातल्या सुक्त ८२मध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, परमपिताच्या नाीस्थानात सृष्टीच्या अगोदरपासून विद्यमान असलेल्या परमतत्त्वानेच जलात एक गर् धारण केला, जे सर्व सृष्टीचे आश्रय व जन्मस्थान आहे. आता या तत्त्वाला व ते तत्त्व धारण करणाऱ्याला वेदपुराणात परमपिता, विश्वकर्ता, विश्वकर्मा वगैरे म्हटले आहे, एव्हढेच...! त्या तत्त्वाला आपण हिग्स बोन्सन का म्हणू नये? 

दत्तसंप्रदायात पूज्य मानल्या जाणाऱ्या गुरुचरित्रात विश्वनिर्मितीबाबत लिहिले आहे. त्यातील कथानकानुसार त्रिदेवापैकी ब्रह्मदेवाने एका हिरण्यमय गर्ाची निर्मिती केली व त्यातून मग सृष्टीची निर्मिती झाली. श्वेताश्वेतरोपनिषदातील तिसऱ्या अध्यायातील चौथा श्लोक म्हणतो -
यो देवानं प्रवश्चोद्भवश्च
विश्वाधिपो रुद्रो महर्षि:।
हिरण्यगर्ं जनयामास पूर्वं
स नो बुद्ध्या शुया संयुनक्तु॥
देवांना, रुद्र व ऋषींना निर्माण करणाऱ्या, त्यांचा अधिपती असणाऱ्या परमदेव विश्वकर्त्यानेच सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदर हिरण्यगर् निर्माण केला. अशा सर्वशक्तिमान विश्वकर्त्याने आम्हाला शु, मंगल बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना या श्लोकातून केली आहे.

या सर्व श्लोकांमध्ये कोठेही देवाने सारं काही जादुगारासारखं निर्माण केलं असं म्हटलेलं नाही. त्याने निर्माण केलं, म्हणजे तो केवळ कर्ता आहे. ते त्याने ज्याच्या सहाय्याने तयार केले, ते हिरण्यगर् होय. आताच्या संशोधनानुसार आपण त्याला हिग्स बोन्सन म्हणू शकतो ना...? परत ही बाब लक्षात घ्यायलाच पाहिजे वेदपुराणाचे व अन्य धर्मांचे मूळ साहित्य लिहिल्या गेले तेव्हाही विज्ञान होतेच, पण आजसारखे ते प्रगत नव्हते. त्यामुळे त्या विवेचनात काही त्रुटी असू शकतात. दोष असू शकतात. ते आजच्या संशोधनाने दूर व्हावयास हरकत नाही. पण देव या शक्ती-संकल्पनेला पूर्णत: त्याज्य ठरवून या पुरात धर्मशास्त्रांना त्याज्य मानणे म्हणजे एक प्रकारचा कट्टरवाद आहे आणि कट्टरवाद तो कोणताही असो वाईटच असतो. देव ही मानवाला सुसंस्कृत, शीलवंत, ज्ञानवंत करणाऱ्या गुणांचे नामाभिदान आहे. आणि म्हणूनच त्याला ईश्वरी कण म्हटले तर काही आाळ फाटणार नाही आणि अंधश्रद्धाही पसरणार नाही. शेवटी विज्ञानाचे एक तत्त्व नेहमी लक्षात ठेवण्याची गरज आहेच. विज्ञान कशालाही शाश्वत मानत नाही. परिवर्तनीय मानते. आज संशोधनातून निघालेले संशोधन हे काही काळ्या दगडावरची रेष मानता येणार नाही. त्यात आणखी संशोधन होतच राहणार. नवनवे सिद्धान्त मांडल्याच जाणार. कारण महास्फोटाची कल्पना असो की हिरण्यगर्ाची... या कल्पनाच आहे. संशोधन त्या कल्पनांवर पुढे जाते आणि ती कल्पना सिद्ध करणारे वा नाकारणारे काहीतरी शोधून काढत असते. आणि तेथेच ते संपतही नाही. ती अविरत प्रक्रिया आहे.

पुन्हा पुराणातील वांगे पुराणातच ठेवा, असा सल्ला कट्टर विज्ञानवादी देतील, हे मला माहीत आहे. म्हणूनच थोर वैज्ञानिक आयझॅक न्यूटनचे उद्गार येथे नमूद करावे वाटते. किमान त्याला प्रतिगामी म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही अशी अपेक्षा आहे. तो म्हणतो -
It seems probable to me that God, in the beginning, formed matter in solid, massy, hard, impenetrable, moveable particles, of such sizes and figures, and with such other properties, and in such proportions to space, as most conduced to the end for which He formed them; and that these primitive particles, being solids, are incomparably harder than any porous bodies compounded of them, even so very hard as never to wear or break in pieces; no ordinary power being able to divide what God had made one in the first creation. 
 [Sir Isaac Newton, From Opticks (1704, 2nd ed., 1718), 375-376]

शेवटी या लेखाच्या प्रारंी नमूद केलेला ऋग्वेदातला श्लोकच महत्त्वाचा आहे. तो निर्माता कोण आणि त्याने हे कसे केले, हे आपण ठामपणे सांगूच शकत नाही. उगाच आत्मप्रौढी बाळगणे वृथा आहे. कवी कुसुमाग्रज आपल्या मातीची दर्पोक्ती या कवितेत म्हणतात,
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती...!
हेच शेवटी खरे...! आजच्या संशोधनाने विश्वनिर्मितीचे गुढ उकलेलही. ते उकलावेही. पण शेवटी जगात शु व्हावे, मंगल व्हावे, ही अपेक्षा सारेच पाहतील. ते शु, मंगल म्हणजेच ईश्वरी गुण आहे. त्या गुणाचा परिपाक म्हणून कोणी हिग्स बोन्सनला ईश्वरी कण म्हणणार असतील तर त्यात आदळआपट करण्याची गरज नाही...

अनंत कोळमकर
8975754483

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा